>

लोनावळा मधे फिरण्यासाठी हे ठिकान आहे उत्तम. एकदा नक्की भेट द्या

लोनावळा मधे फिरण्यासाठी हे ठिकान आहे उत्तम. एकदा नक्की भेट द्या

 

1. बोरगावचे बोटिंग क्लब

बोरगावचे बोटिंग क्लब हे एक सुंदर ठिकाण आहे, जिथे निसर्गाच्या कुशीत बोटिंग करताना मन मोहून टाकणारे दृश्य पाहायला मिळतात. तलावात बोटिंग करताना, शांत वातावरणात मन रमत आणि आपल्याला ताजगीचा अनुभव येतो. पाण्याच्या हळुवार लाटा, निळसर आकाश आणि सभोवताली पसरलेली हरित शांती, यामुळे इथे वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही.लोणावळा मधे आलेला प्रत्त्येक माणूस इथे भेट देतो.

2. लोहगड किल्ला

लोहगड किल्ला हा इतिहासाच्या खुणा जपणारा एक अद्वितीय ठिकाण आहे. किल्ल्यावर चढताना, सह्याद्री पर्वतराजांच्या सौंदर्याचे दर्शन होते. इथला सूर्यास्त पाहताना, मनात एक वेगळाच आनंद निर्माण होतो. जणू काही सूर्य आपल्यासाठीच जातोय असे भासते. इतिहासप्रेमींसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गच

3. भुशी धरण

भुशी धरण हे लोनावळ्याचे एक प्रमुख आकर्षण आहे. पावसाळ्यात या धरणाचे सौंदर्य अजूनच खुलते. इथल्या पाण्याच्या प्रवाहात ईथे आलेले लोक खूप आनंद घेतात.

4. भजा लेणी

भजा लेणी ही कार्ला लेण्यांप्रमाणे प्राचीन बौद्ध लेणी आहेत. इथल्या शिल्पकलेचे दर्शन घेताना, आपण भूतकाळात हरवून जातो. दगडांच्या तुकड्यांमध्ये कोरलेल्या या कलाकृतींमध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. इथे येऊन, इतिहासाच्या खुणांचा अनुभव घेता येतो.
कार्ला लेणी ला भेट देता तर या लेणींना पण एक भेट द्या.

 

5. विन्हेरे वॉटरफॉल

विन्हेरे वॉटरफॉल हा लोनावळ्याचा एक सुंदर धबधबा आहे, जिथे पर्यटकांना पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य पाहायला मिळते. धबधब्याचे थंड पाणी आणि सभोवतालची हिरवाई मनाला ताजगी देते. इथे काही वेळ बसून निसर्गाच्या सान्निध्यात रमण म्हणजे जणू स्वर्गसुखच.

 

6. शिंदे वाडी हिल्स

शिंदे वाडी हिल्स हे एक सुंदर ठिकाण आहे, जिथे पर्यटकांना ट्रेकिंगचा आनंद घेता येतो. इथून लोनावळ्याचे विस्तृत दृश्य पाहता येते. निसर्गाच्या कुशीत रममाण होऊन, मनाला नवचैतन्य मिळते. ट्रेकिंग प्रेमींसाठी हे ठिकाण एक आवडते  आहे.

 

 

 

महाराष्ट्र मध्ये फिरायचा प्लॅन असेल तर या ठिकणी नक्को फेट द्या

 

 

लोणावळ्यात भेट देण्यासाठी 17 सर्वोत्तम पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या इतर गोष्टी

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment